उपयोग नाही तेव्हा तु त्याला विचारलंस, "माझ्याशी लग्न का केलतं?"तो म्हणाला, " तु माझ्यावर प्रेम केलसं म्हणून..."तु विचारलंस, "ती अभिलाषा असेल तर?"तो म्हणाला, "पाण्यावरच्या तरंगाप्रमाणे अभिलाषा एखाद्या जलाशयाच्या पृष्ठभागावर उमटते. खरं प्रेम, त्याच जलाशयाच्या तळाशी असलेल्या जिवंत झऱ्यासारखं असतं. मला अभिलाषा वाटली यात गैर नाही. आता झऱ्याप्रमाणे प्रेम कर. "म्हणजे कसं?" झऱ्यासारखी झुळझुळत रहा. जमायलाच हवं. तु आटलीस की मी संपलो.झऱ्याला कोण आटवतो?संशयाचं शेवाळं"

No comments:

Post a Comment