पुरुषानं बाईकडे पाहत राहणं यात अस्वाभाविक काय आहे? हे पाहणं अर्थातच देखणेपणावर अवलंबून असतं. ह्यात वाद नाही. त्या बाबतीत सगळ्या पुरुषांच एकमत होईल. प्रत्येक पुरुष पाह्तोच पाहतो. त्या पाहण्याला रसिकत्व लागतं. ते कोणत्याही क्रमिक पुस्तकातून मिळत नाही. ते प्रत्येकाजवळ उपजत असतं. त्याचप्रमाणे ज्या बाईकडे पहायचं ते तिच्या लक्षात न येता कसं पहायचं ह्याचं शिक्षणही शिक्षण खात्यानं मंजूरी दिलेल्या पुस्तकात मिळत नाही.

No comments:

Post a Comment