तप्तपदी

"आयुष्यात जो अत्यंत महत्वाचा निर्णय असतो,की ज्या निर्णयामुळे सगळ्या भवितव्याला कलाटणी मिळण्याची शक्यता आहे,अशा क्षणी कुणावरही विसंबुन रहायचं नाही.आपला बेत फ़सला किंवा कुणीतरी उधळुन लावेल अशी परिस्थिती निर्माण होऊ द्यायची नाही.निर्णयाच्या क्षणी आपण स्वतंत्र असलं पाहीजे."

"लग्नासारखा एक निर्णय आबाद किंवा बरबाद करायला पुरेसा असतो.अशा वेळी व्यक्ती स्वतंत्र हवी."

"समस्या आणि उत्तर ह्यात वेळ म्हणजे Time Factor असतो.Forth Dimension म्हणतात तो Factor.म्हणुनच एका उत्तराची वेळ टळली की दुसरं उत्तर शोधावचं लागतं."

"उत्तम आणि उच्च पदवी हीसुद्धा ऎपतच आहे.नुसत स्वाभिमान आहे,पण कोणतीच पात्रता नाही ती माणसं जास्तीत जास्त मग्रुर असतात."

"एखादी व्यक्ती जाता-जाता जेव्हा आपल्याला अपेक्षित नसलेला कॉमेंट करते.तेव्हा त्यांच फ़क्त नवल वाटतं.पण केव्हातरी सगळ्या आयुष्याचा पट उलगडुन बसण्याचा क्षण येतो तेव्हाच त्या माणसाचे खरे विचार समजतात.पृष्ठभागावरुन नुसतचं वाहुन गेलेलं पाणी किती आणि जमिनीने धरुन ठेवलेलं किती हे ’बोअरवेल’ खणल्याशिवाय कळत नाही.वर्ष संपलं की आपण नवीन Calender आणतो.काही वाणसामानाबरोबर फ़ुकट येतात.कधीकधी Calender साठी आपण अनावश्यक वस्तुही घेतो.प्रत्येक महीन्याला वेगवेगळं चित्र असलेलं,कधी जाहीरपणे लावता न येणारं किंवा लावता येणारं,भारी Calender ही आपण पळवलेलं असतं.कितीही आकर्षक -आकर्षक म्हटलं तरी त्याच नाविन्य किती काळ?
नाविण्याइअतकी चटकन शिळी होणारी दुसरी कोणतीही वस्तु नसेल.भिंतीकडेच पाहत आयुष्य घालवणार्‍या रिकामटेकड्यांना Calender वर कुठलही चित्र चालतं.व्यक्तीमत्व घडवणार्‍या माणसांच्या बाबतीत,तारखांचे चौकोन जास्त सचित्र असतात.प्रत्येक चौकोनावर वेगळं चित्र,वेगळा विचार,वेगळी प्रगती,वेगळं शिखर.तो पट जेव्हा जेव्हा उलगडला जातो तेव्हाच समोरच्या माणसाला जाणवतं की,प्रत्येक श्वासाचं दाम मोजुन श्याम विकत घेणारी गदिमांची नायिका आणि समोरचा माणुस एकच आहे.बुद्धी,मन आणि शरीराच दान करुन ह्या माणसाने Calender चा कालनिर्णय स्वतः विकत घेतला आहे."