ही वाट एकटीची


मोहाच्या क्षणी बुद्धीवर भावना मात करते.

प्रामाणीकपणा शिकवायचा नसतो तो असावाच लागतो. त्यात टक्केवारी नसते. तो असतो किंवा नसतो.

अपेक्षीत गोष्टीपेक्षा अनपेक्षीत गोष्ट जास्त आनंद देते.

जेव्हा नजरच हरवते तेव्हा समोरच्या दृष्याला काही अर्थ राहतो का?

प्रतिक्षेचा क्षण नेहमीच मोठा असतो.

कैफ़ाच्या क्षणी दोनच गोष्टी खर्‍या.तो क्षण आणी तो कैफ़.

हे आयुष्य रित सांभाळण्यासाठी जगायचं की कैफ़ लुटण्यासाठी?

जवळच्या माणसाचा स्वभाव कितीही पुरेपुर माहीत असला तरी जगावेगळी समस्या उभी राहीली तर तो कसा वागेल हे सांगता येत नाही.

अंगात धडाडी असणारी माणसचं वाव मिळेल तिथं उडी घेतात.

दृष्टीवर वाजवीपेक्षा जास्त विश्वास टाकला की चुकीची वाट सुद्धा बरोबर वाटायला लागते.

रसिकतेचं नातं देहाशी नसतं. ते टवटवीत मनाशी असतं.

माणुस हा एकच असा विषारी प्राणी आहे की ज्याच्या विषाचं मर्मस्थान सापडलेलं नाही

1 comment: