दुर्गुणांना अनेक रूपं धारण करता येतात आणि त्यांच्या मोहात पडावं इतकी ती आकर्षक असतात.
लोकाना ह्या अशाश्वत जगात सतत शाश्वती हवी असते.
जिथे उमटलेला शिक्का जतन केला जाईल, तिथेच शिक्का उमटवा. नाहीतर ते निवडणुकीचे शिक्के होतात.
बोलायला कुणी नसणं ह्या शोकांतिकेपेक्षा, आपण बोललेलं समोरच्यापर्यंत न पोहचणं ही शोकांतिका जास्ती भयाण.
जे सुटत नाही त्यालाच व्यसन म्हणतात
मुक्ता मार्गदर्शन फक्त एकाच बाबतीत करता येतं. कोणत्या रस्त्याने गेलो तर शॉर्टकट पडतो. इतकचं मार्गदर्शन करता येतं. मुक्कामाचं ठिकाण प्रवाशानंच पसंत करायच असते
माझा एक मित्र आहे. तो मोटारमेकॅनिक आहे.त्यानं बायकोचं नाव किटकिट ठेवलंय.तो म्हणतो कायम मोटार आणि बायको किटकिट करत असतात. दोघींची कितीही मिजास सांभाळा.
बापाला दारिद्र्याचा वारसा मुलाला द्यायला आवडत नाही आणि मुलाला बापाकडुन समुपदेश घ्यायला आवडत नाही.
दुसर्याच्या पगाराच्या मिळकतीची चौकशी करणं हे अत्यंत संस्कारहीन समजतात. असंस्कृत मानतात.' तुम्हाला काय कमी आहे? ' असं फाडकन कुणाला विचारु नये. ज्यांना काही कमी नसतं त्यांना खर्चही कमी नसतात.
मोठयातला मोठा माणुस जेव्हा त्याचे मोठेपण विसरतो, तेव्हा त्याच्यासारखा क्रूर प्राणी दुसरा कुणीही होवू शकत नाही.
पाण्याने अंगार विझतो म्हणतात हे साफ चुक आहे. तिच्या अश्रुपातानं अंगात निखारे फुलायला लागले.
प्रत्येक माणूस आणि स्त्री, स्वत:च्या प्रेमाला पवित्र मानते. स्वत:च ते affair आणि दुसऱ्याचं ते लफडं
देवा- ज्या दुनियेत पैसा हेच सत्य, सत्ता हे शिवं आणि स्त्रीचा देह हे सुंदरम आहे, त्यांना तुम्ही काय चमत्कार दाखवणार? त्यांचे चमत्कार पाहून तुम्ही दिपून जाल.
अक्षर भिकार असूनही जे डॉक्टर होऊ शकत नाहीत ते सगळे रेल्वेत रिझर्वेशन क्लार्क होतात.
जगात सर्वात मुर्ख कोण?पत्ता शोधणारा माणूस.
स्वत:चे अनुभव उगीचच दुसऱ्याला सांगू नयेत. इतरांना एकतर ते अनुभव खोटे वाटतात, नाहीतर आपण स्वत: खोटे वाटतो. ज्याने त्याने स्वत:च्या मालकीचे अनुभव घ्यावेत.
No comments:
Post a Comment