समस्या आपली आणि त्याचं उत्तर मात्र इतरत्र, असं घडत नाही. उत्तराची मागची बाजू म्हणजेच समस्या. आपण फक्त बघण्याची दिशा बदलायची.
सेवा ही वृत्ती म्हणून यावी.मग क्षेत्र कुठलेही असो.त्याला अधिकाराचा किंवा औपचारिकतेचा नको तेवढा संसर्ग नको.असे झाले तर आजीबाई खिडकी बंद करा कानाला वारा लागत नाही का? असे म्हणणारा कंडक्टर, साब चाय ठंडी हो जायेगी असे अदबिने म्हणणारा वेटर, किति दग-दग करता शामराव ह्या वयात असे बोलून छातीला स्टेथो लावणारा डॉक्टर, हे सेवा देताना अजून सुंदर दिसतील. वाईट बातमीची तार आणि नोकरी लागल्याचे पत्र त्याच निर्विकार चेहरयाने देणारा पोस्ट-मन कसा वाटेल?
No comments:
Post a Comment