वपुर्वाई

प्रेम निर्माण व्हायला सहवासाची मदत लागते. जितका सहवास जास्त तितके प्रेम जास्त. आकर्षणाला एक सेकंदाचा सहवास पुरतो. म्हणुनच आकर्षणाला अस्तित्व काही सेकंदापुरतचं असतं.


फ़ायदा नेहमी गरीब स्वभावाचा घेतला जातो.तुम्ही भिडस्त आहात ना हेच समोरचा माणुस हेरत असतो. बोडक्यावर बसुन तुम्ही पै न पै वसुल करणार्‍यांपैकी नव्हेत, याची खात्री पटल्यावरच तुमच्याशी व्यवहार केला जातो.अशा माणसांकडे तुमच्यापेक्षा मोठ्यांदा गळा काढण्याचं सामर्थ्य आणी तुमच्यापेक्ष्या मोठ्या अडचणींची यादी असते.


परिस्थिती बदलणारे आपण कोण? गृहीत धरायची शक्ति एवढ्यासाठीच वाढवायची, त्यामुळे 'मन' नावाची एक दुर्मिळ वस्तू सुरक्षित राहते. टवटवीत राहते. मन कोसळलं की माणूस कोसळला मन शाबूत ठेवलं की आयुष्य पैलथडीला हसतखेळत नेता येतं. माणूस प्रथम मनान खचतो. तसं झाल की प्रवाह संथ असतानाही त्यांच्या होड्या उलटतात. आपण फक्त एवढच करू शकतो की आपण आपला शब्द फिरवल्यामुळे दुसर्‍याची होडी बुडणार नाही ना एवढीच काळजी घ्यायची, म्हणजे घेऊ शकतो.


शरीर ही दिसणारी गोष्ट आहे. दोन व्यक्तीना एकमेकांबद्दल विचार करायला लावणारं आणि म्हणूनच जवळ असणारं ते माध्यम आहे. शरीर गौन मानण्यात काहीच अर्थ नाही. संसाराचा प्रवासच ह्या स्टेशनावरून सुरू होतो. तेव्हा हे पहीलं स्टेशन चुकवता येत नाही. तिथ रेंगाळू नये वा तिथंच मुक्काम करू नये. पण चुकवता कसं येईल? सौंदर्याचा वेध नेहमीच दृश्यापासून अदृश्याकडे जाणारा असतो. प्रत्येक जण आपापल्या कुवतीनुसार अधलं मधलं स्टेशन निवडतो. सगळेच संसार बघून सावरूनही सुखाचे होत नाहीत ह्याच कारण ते आहे पहीलं स्टेशनच ते सोडायला तयार नसतात. रंगमंचावरचा संसार आणि प्रत्यक्षातला संसार ह्यात हाच फरक आहे. रंगमंचावरचा संसार आणि प्रवास फक्त शरीराचा संसार. तिथ सौंदर्य आणि शरीर संपला की प्रवास संपला.


माझी संसाराची व्याख्याच निराळी आहे.एकमेकांचे वाभाडे काढण्यासाठी किंवा वर्मावर चोची मारण्यासाठी संसार करायचा नसतो.जिथं जोडीदार कमी पडेल तिथं आपण उभं राहायच.
मी तुला स्वीकारलं ते तुझ्या वलायासहित स्वीकारलं. माणसाच्या स्वभावतली एखादी छटा म्हणजे तो संपूर्ण माणूस नाही. एखाद्या क्षणी एखादी भावना अनावर होते. का? ह्याचं कारण ज्याचं त्याच्याजवळ नसतं.भावनांचे तिढे आपण बुद्धीने सोडवायला बघतो आणि बुद्धिवादानं कठोर प्रश्न सोडवायचे असतात. तिथं आपण भावनेचा घोळ घालतो ही सगळी झापडच.


'निर्णय चुकीचा आहे की योग्य आहे हे काळा वर मोजायच की बुद्धीवर? तुम्हाला बुद्धीच नसेल तर पेपर सोडवायला संपूर्ण तीन तास नव्हे, अख्खा दिवस दिला तरी काय उपयोग? आपण सगळ्या गोष्टी वापरायला शिकतो, फक्त वेळ वापरायला शिकत नाही. किल्लीच घड्याळ गेल Electronic च आल. वेगवेगळी घड्याळ वापरायची की संपल..'


No comments:

Post a Comment